ब्युरो टीम : चीनसह जगातील बहुतांश देशात करोना रुग्ण वाढू लागले आहेत.त्यामुळे भारतात केंद्र सरकारने खबरदारीची पावलं उचलली आहेत. मास्क आणि बुस्टर डोसची घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. तर, आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
परदेशांतून भारतात येणाऱ्या विमान प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांच्या करोना चाचण्या होतील याची दक्षता घ्या, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला गुरुवारी केली. २४ डिसेंबरपासून यादृच्छिक पद्धतीने (रँडम) या चाचण्या होतील. चाचण्या केल्यानंतर प्रवाशांना विमानतळावरून जाण्याची मुभा असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवास करण्याच्या ७२ तासांआधी प्रवासांनी आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल. तसंच, चीन आणि अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्राची माहिती देण्यासाठी एअर सुविधा फॉर्म पुन्हा लागू करण्याचा विचार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे.
भारतात येणाऱ्या प्रवाशाला लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. तसंच, मास्क नसेल तर प्रवेश रोखण्यात येणार आहे. प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर प्रवाशांची थर्मल स्क्रिनींग करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा