ब्युरो टीम : नरेंद्र मोदी यांच्या भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये घवघवीत यश मिळवले. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना भाजपने २००२ साली सर्वाधिक १२७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने हा विक्रम मोडीत काढला आहे. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप १८२ पैकी १५४ जागांवर आघाडीवर आहे. हा ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहिल्यास भाजपला गुजरातमध्ये न भूतो न भविष्यती असा विजय मिळणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. दीडशेहून अधिक जागांवर भाजपने विजयी आघाडी घेतलेली आहे. तर काँग्रेसची ऐतिहासिक घसरण झाली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता भाजप १५४, काँग्रेस १८, आप ६ तर इतर ४ जागांवर विजयी किंवा आघाडीवर आहेत.
भाजपने ही मुसंडी मारताना काँग्रेसचा विक्रमही मोडित काढला आहे. १९८५ मध्ये काँग्रेसने दीडशतकी जागा जिंकून इतिहास रचला होता. गेल्या ३७ वर्षांत कुठल्याही पक्षाला १५० हून अधिक जागा जिंकता आल्या नव्हत्या. अगदी गेली २७ वर्ष सत्तेवर असणाऱ्या भाजपलाही ते जमलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ मध्ये भाजपने १२७ जागा जिंकल्या होत्या. हा भाजपने आतापर्यंत पटकवलेल्या जागांचा कमाल आकडा होता. मात्र यावेळी भाजपने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा