FIFA WC 2022 : फुटबॉल प्रेमींसाठी मोठी बातमी, लिओनेल मेस्सीचे मोठं वक्तव्य



ब्युरो टीम : फिफा विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने झुंजार क्रोएशियाचा 3 - 0 असा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. मात्र, अंतिम सामन्यात  गेल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने मोठं वक्तव्य केलं आहे.  त्यामुळे फुटबॉल विश्वात चर्चेला उधाण आले आहे. 

अंतिम सामना गाठल्यानंतर 35 वर्षाचा मेस्सी पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, 'माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा फायनल खेळून संपणार आहे, याबाबत मी खूप खूष आहे. पुढचा वर्ल्डकप खूप वर्षांनी होणार आहे. मला नाही वाटत की मी पुढचा वर्ल्डकप खेळू शकेन. माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा उत्तमरित्या संपणार आहे.'

याप्रंसगी मेस्सीने स्वतःच्या वैयक्तिक रेकॉर्डबद्दल सुद्धा भाष्य केले. तो म्हणाला, 'रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत, मात्र सांघिक उद्दिष्ट साध्य करणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. आमच्या दृष्टीने ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. आम्ही फक्त एक पाऊल मागे आहोत. आम्ही सर्वस्व पणाला लावून लढलो आहे. यावेळी वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही सर्व काही पणाला लावू.'

दरम्यान, फिफा विश्वचषक 2022 मधील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियावर 3 गोल नोंदवत शानदार विजय मिळवला. लुसेल स्टेडियमवर हा सामना रंगला. आता अंतिम फेरीत त्याचा सामना याच मैदानावर गतविजेता फ्रान्स किंवा मोरोक्कोशी 18 डिसेंबर रोजी होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने