ब्युरो टीम : फिफा विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये फ्रान्सनं मोरक्कोचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवले. अंतिम सामन्यात आता फ्रान्सची लढत 18 डिसेंबरला अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. मोरक्कोची या स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी झाली होती, पण फ्रान्सविरुद्ध त्यांना विजय मिळवता आला नाही. फ्रान्सनं ही लढत 2-0 अशी जिंकली.
फ्रान्सनं मोरक्कोविरुद्ध आक्रमक खेळ केला. मॅचच्या पाचव्या मिनिटाला फ्रान्सच्या थियो हर्नांडेजने गोल करून खळबळ उडवली. त्यानंतर फ्रान्सचे खेळाडू सातत्याने मोरक्कोच्या गोल पोस्टवर धडकत होते. पहिल्या हाफमध्ये फ्रान्सकडे 1-0 अशी आघाडी होती. दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने 79 व्या मिनिटाला गोल करत आघाडी आणखी वाढवली. फ्रान्सकडून दुसरा गोल रॅडल कोली मुआनीने केला. तो सब्सीट्यूट म्हणून मैदानात उतरला होता. मैदानात येताच 44 व्या मिनिटाला त्याने गोल केला. त्यानंतर फ्रान्सने मोरक्कोला कोणतीही संधी दिली नाही.
दुसऱ्या हाफमध्ये मोरक्कोने आक्रमक खेळ केला. पण फ्रान्सची डिफेन्स ते भेदू शकले नाहीत. त्यातच फ्रान्सने दुसरा गोल केला. मोरक्कोचे फिफा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. दरम्यान, मोरक्को हा आफ्रिकेतील पहिला देश ठरला ज्याने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना अंतिम फेरीचे तिकिट मिळवता आले नाही.
मोरक्कोच्या चाहत्यांचा फ्रान्समध्ये राडा
मोरक्कोच्या चाहत्यांनी फ्रान्सची राजधानीत धुमाकूळ घातला. संघाच्या पराभवानंतर मोरक्कोचे चाहते फ्रान्सच्या चाहत्यांशी भिडले. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात मोरक्कोचे नागरिक राहतात. परिस्थिती हाताबाहेर जात होती असे दिसताच पोलिसांनी पाण्याचा वापर केला आणि अश्रूधुर सोडले. करातमध्ये झालेल्या सामन्यानंतर फ्रान्समध्ये हा प्रकार सुरू झाल. त्यामुळे देशातील अनेक शहरात पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.
टिप्पणी पोस्ट करा