ब्युरो टीम : फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. अर्जेंटिना व फ्रान्स या दोघांचेही प्रत्येकी दोन गोल झाले आहेत. कतारमध्ये आज, रविवारी हा सामना होत आहे.
आजच्या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला होत आहे. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक होतोय. कारण या सामन्यात किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू झुंजताना दिसत आहेत. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पहिल्या सत्रात २-० ने आघाडीवर होता. संघासाठी लिओनेल मेस्सीने पहिला तर अँजेल डी मारियाने दुसरा गोल केला. दोन्ही गोलांमुळे अर्जेंटिनाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पण, सामन्याच्या उत्तरार्धात एमबाप्पेने सलग दोन गोल करीत फ्रान्सचे शानदार पुनरागमन केले.
सामन्याला सुरुवात झाली तेव्हा २० मिनिटांपर्यंत एकही संघ आक्रमक खेळ करताना दिसला नाही. दोन्ही संघांना एकही गोल करता आलेला नव्हता. स्कोअर ०-० असा बरोबरीत होता. अल्वारेझने तिसरा आणि रॉड्रि डी पॉलने सातव्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्जेंटिनाला यश मिळू शकले नाही. अल्वारेझचा फटका थेट फ्रेंच गोलरक्षक ह्युगो लॉरिसच्या हातात गेला. त्याचवेळी डी पॉलचा फटका फ्रान्सच्या खेळाडूवर आदळला आणि गोलपोस्टजवळून बाहेर गेला.
त्यानंतर स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने शानदार खेळ दाखवला. त्याने अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याने २३व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने पेनल्टी बॉक्समध्ये अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाला खाली आणले. त्याची चूक पाहून रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी दिली. कर्णधार मेस्सीने कोणतीही चूक न करता चेंडू थेट गोलपोस्टमध्ये टाकला. आक्रमक खेळ कायम ठेवत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सविरुद्ध दुसरा गोल केला. ३६व्या मिनिटाला एंजल डी मारियाने गोल पोस्टमध्ये चेंडू टाकला. फ्रान्सचा उपमेकानो चेंडूवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मेस्सीने मॅकअलिस्टरकडे चेंडू पास केला. मॅकअलिस्टरने डी मारियाकडे चेंडू पास केला. डी मारियाने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला.
सामन्याच्या उत्तरार्धात फ्रान्सला ८०व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली, ती स्टार खेळाडू कायलियन एमबाप्पेने घेतली. गोलरक्षक मार्टिनेझ पूर्णपणे तयार होता, पण एम्बाप्पेचा फटका तो रोखू शकला नाही. अशाप्रकारे फ्रान्सने पहिला गोल नोंदवून सामन्यात पुनरागमन केले आहे. त्याने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करून सामना बरोबरीत आणला.
टिप्पणी पोस्ट करा