ब्युरो टीम : फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना जिंकत अर्जेंटिना विश्वविजेता ठरला आहे. अतिशय चुरशीच्या मुकाबल्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर मात करीत हा सामना जिंकला. कतारमध्ये आज, रविवारी हा सामना झाला.
आजच्या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक झाला. कारण या सामन्यात किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू झुंजताना दिसले. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पहिल्या सत्रात २-० ने आघाडीवर होता. संघासाठी लिओनेल मेस्सीने पहिला तर अँजेल डी मारियाने दुसरा गोल केला. दोन्ही गोलांमुळे अर्जेंटिनाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पण, उत्तरार्धात एमबाप्पेने सलग दोन गोल करीत सामन्यात फ्रान्सचे शानदार पुनरागमन केले.
निर्धारित वेळ आणि दुखापतीच्या वेळेनंतरही फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील हा अंतिम सामना २-२ असा बरोबरीत राहिला. त्यामुळे विजय-पराजयाचा निर्णय अतिरिक्त वेळेत होणार असल्याचे स्पष्ट झाले. पण, वाढीव वेळेच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. १०८व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत संघासाठी तिसरा गोल करत अर्जेंटिना संघाला ३-२अशी आघाडी मिळवून दिली. मात्र,११८ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत कायलियन एम्बाप्पेने फ्रान्सला सामन्यात परत आणले, व स्कोअर ३-३ वर पोहोचला. अतिरिक्त वेळेतही निकाल न लागल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. तिथे हा सामना अर्जेंटिना ने जिंकला.
सविस्तर लवकरच....
टिप्पणी पोस्ट करा