Fixed Deposit : भारीच! या 3 बँकांनी वाढवले FD वरचे व्याजदर


ब्युरो टीम
: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतंच रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली. त्यानंतर होम लोन कार लोन आणि पर्सनल लोन महाग झालं आहे. मात्र, दुसरीकडे काही बँकांनी आपल्या मुदत ठेव अर्थात FD च्या व्याजदरातही वाढ केली आहे. जर तुम्हाला पैसे गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी खालील बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचं ठरू शकते. 

ICICI बँकेनं 3.00 आणि 6.60 वरील व्याजदर वाढवले आहेत. 2 कोटींपर्यंतच्या रकमेवर किती काळासाठी पैसे ठेवले त्यानुसार व्याजदर मिळणार आहे.

HDFC बँकेनं देखील आपल्या ग्राहकांसाठी FD वरील व्याजदर वाढवले आहेत. 3 ते 6.25 आणि सीनियर सिटिझनसाठी 3.5 ते 7 पर्यंत व्याजदर वाढवण्यात आले आहेत. किती कालावधीसाठी तुम्ही FD ठेवता त्यानुसार हे दर लागू होणार आहेत.

SBI ने फिक्स डिपॉझिटवरचे व्याजदर 65 बेसिस पॉईंटने वाढवलं आहे. 2 कोटींपेक्षा कमी FD वर हा व्याजदर लागू होणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. सर्वाधिक वाढ 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या योजनेसाठी असून ती 6.10 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आली आहे.

तुम्हाला वाढलेले व्याजदर या बँकांच्या ऑनलाईन वेबसाईटवर देखील पाहायला मिळू शकणार आहेत. सध्या व्याजदर वाढल्याने तुम्ही

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने