Gram Panchayat Election : ७१३५ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान, आता निकालाची प्रतिक्षा



ब्युरो टीम : राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यानुसार आज प्रत्यक्षात ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले.   या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान झाले.

आज ठाणे जिल्ह्यात ३५ ग्रामपंचायती, पालघर -६२, रायगड - १९१, रत्नागिरी - १६३, सिंधुदुर्ग - २९१, नाशिक - १८८, धुळे - ११८, जळगाव - १२२, अहमदनगर - १९५, नंदुरबार - ११७, पुणे - १७६, सोलापूर - १६९, सातारा - २५९, सांगली - ४१६, कोल्हापूर - ४२९, औरंगाबाद - २०८, बीड - ६७१, नांदेड - १६०, उस्मानाबाद- १६५, परभणी - ११९, जालना - २५४, लातूर - ३३८, हिंगोली - ६१, अमरावती - २५२, अकोला - २६५, यवतमाळ - ९३, बुलडाणा - २६१, वाशीम - २८०, नागपूर - २३४, वर्धा - १११, चंद्रपूर - ५८, भंडारा - ३०४, गोंदिया - ३४५ तर गडचिरोली जिल्ह्यात २५ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.

दरम्यान, यासर्व ठिकाणी २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभरात कोणता पक्ष बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने