Hijab : या देशातील संस्कृतीरक्षक पोलिसांचा गाशा गुंडाळला, हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश



ब्युरो टीम :  इराणमध्ये हिजाबविरोधात दोन महिने सुरु असलेल्या महिलांच्या आंदोलनासमोर अखेर इराणचे सरकार झुकले आहे. इराणमधील ‘संस्कृतीरक्षक पोलीस’ हे पथक बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत  इराणचे अॅटर्नी जनरल मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी माहिती दिली.

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांना हिजाब परिधान करणे अनिवार्य आहे. महिलांनी योग्य पद्धतीने हिजाब परिधान केला का नाही, यासाठी ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’ची नेमणूक करण्यात आली होती. हिजाबसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्यास ‘संस्कृतीरक्षक पोलीस’ महिलांना अटक करतात. हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’नी अटक केली होती. अटक केल्यावर महिसाची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. महसाच्या मृत्यूनंतर संस्कृतीरक्षक पोलिसांची तिचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला पेटून उठल्या होत्या.

घटनेनंतर इराणमधील महिला ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’च्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. अखेर दोन महिने सुरु असलेल्या आंदोलनानंतर इराणचे सरकार झुकले आहे. 

याबाबत मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी सांगितलं की, “संस्कृतीरक्षण पोलीस हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मात्र, हा निर्णय कायमस्वरुपी ही तात्पुरत्या स्वरूपासाठी घेण्यात आला आहे, याबद्दल माहिती दिली नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने