ब्युरो टीम : पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्या व पाकिस्तानमधील पहिल्या महिला हिंदू खासदार कृष्णा कुमारी यांनी ट्विट करीत एक धक्कादायक माहिती दिली आहे. पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात एका हिंदू महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ४० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. इतकंच नाही तर तिचे स्तनही कापून टाकण्यात आले असल्याची कृष्णा कुमारी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेत्याने बुधवारी शेतात मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली आहे. तसंच पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाकडून माहिती गोळी केलं असल्याचं म्हटलं आहे. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास सुरु असल्याचंही सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/KeshooBai/status/1608315618138144769?s=20&t=w3-syaOl7qeGD__L8tH8Tg
याबाबत कृष्णा कुमारी यांनी ट्विट केल असून त्यात म्हटलं आहे की, ‘४० वर्षीय विधवा दया यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, वाईट अवस्थेत मृतदेह आढळला. तिचे शीर वेगळे करण्यात आले होते आणि रानटी लोकांनी संपूर्ण डोक्याचे मांस काढून टाकले होते. मी तिच्या गावाला भेट दिली. पोलिसांची पथकही पोहोचली आहेत’. डित महिलेच्या शरीर आणि चेहऱ्यावरील कातडीही सोलून काढण्यात आले आहे. पीडित महिलेला चार मुलं आहेत.
टिप्पणी पोस्ट करा