IND vs BAN : बांगलादेशच्या अखेरच्या जोडीचा टीम इंडियाला धक्का, वाचा नेमकं काय घडलं

 


ब्युरो टीम : भारत व बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना चांगला रंगतदार झाला. भारताने बांगलादेशची ९ बाद १३६ अशी अवस्था केली होती. पण बांगलादेशच्या अखेरच्या जोडीने यावेळी भारताच्या हातून विजय खेचून नेला. बांगलादेशच्या मेहंदी हसने मिराजने यावेळी निर्णायक खेळी साकारली आणि भारताकडून विजय हिसकावून घेतला.

प्रथम फलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांनी या सामन्यात बांगलादेश गोलंदाजी समोर नांगी टाकली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन अपयशी ठरले. पण लोकेश राहुलने ७३ धावा करत संघाची लाज राखली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा करता आल्या. 

भारताच्या १८७ धावाचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर दीपक चहरने धक्का दिला. पण त्यानंतर मात्र कर्णधार लिटॉन दासने भारताच्या गोलंदाजीचा चांगला प्रतिकार केला. दासने यावेळी ४१ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. दासला अर्धशतक झळकावता आले नसले तरी त्याने संघाच्या डावाला चांगला आकार दिला. त्यानंतर भारताच्या मार्गात शकिब अल हसन हा मोठा अडसर होता. पण यावेळी विराट कोहलीने त्याचा भन्नाट झेल पकडला आणि भारताला मोठे यश मिळवून दिले.  त्यानंतर महमदुल्लाह आणि मुशफिकर रहिम ही अनुभवी जोडी मैदानात होती. त्यामुळेच भारताच्या विजयाच्या आशा धुसर दिसत होत्या. पण हे दोघेही सलग चेंडूंवर बाद झाले आणि सामन्यात नवा ट्विस्ट आला. पण अखेरच्या जोडीने यावेळी चचांगली झुंज दिली आणि भारताला पराभूत केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने