Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंची ‘या’ जिल्ह्यात सर्वत्र चर्चा, कारणही तसच...

ब्युरो टीम : राजकारणावर कीर्तनातून उपहासात्मक भाष्य करणाऱ्या कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सासूबाईंनी ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजयी मिळवला आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या अपक्ष विजयी झाल्यात आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांचा त्यांनी पराभव केलाय. त्यांच्या विजयाची नगर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 

राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल आले आहे. राजकारणात ज्यांना दिग्गज समजले जाते, अशा अनेकांना पराभवाचा धक्का बसला आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत मात्र इंदोरीदकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्यात.

इंदोरीकर महाराज हे अनेकदा त्यांच्या  कीर्तनातून राजकारणावर टीका करीत असता. मी कोणत्याच पक्षाला सपोर्ट करत नाही, असे तर ते नेहमी सांगत असतात. मात्र, आता त्यांच्या सासुबाईच अपक्ष म्हणून निवडून आल्या असून  याप्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने