IPL : आज आयपीएल लिलाव, कोणाला मिळणार जास्त किंमत?



ब्युरो टीम : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ या हंगामासाठी आज कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.  लिलावासाठी ४०५ खेळाडू निवडले गेले आहेत. या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी विविध संघ मोठा पैसा खर्च करू शकतात.

लिलावात सहभागी झालेल्या सर्व १० फ्रँचायझींकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी ८७ स्लॉट रिकामे असतील. म्हणजेच जास्तीत जास्त खेळाडू खरेदी करता येतील. परदेशी खेळाडूंसाठी स्लॉटची कमाल संख्या ३० आहे. प्रत्येक फ्रँचायझीच्या संघात केवळ २५ खेळाडू असू शकतात, त्यापैकी जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडू असू शकतात. २०२३ च्या लिलावामध्ये खेळाडूंची कमाल मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. यामध्ये १९ परदेशी खेळाडू आहेत. ११ खेळाडूंची मूळ किंमत १.५ कोटी रुपये आहे. याशिवाय मयंक अग्रवाल आणि मनीष पांडे हे दोन भारतीय खेळाडू अशा २० खेळाडूंच्या यादीत आहेत, ज्यांना १ कोटी रुपये किंमतीच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, आज लिलावासाठी निवडलेल्या ४०५ खेळाडूंपैकी २७३ खेळाडू हे भारतीय आहेत, तर १३२ खेळाडू परदेशी आहेत, ज्यांच्यावर १० फ्रेंचायझी बोली लावतील. या १३२ खेळाडूंपैकी ४ खेळाडू असोसिएट देशाचे आहेत. या खेळाडूंमध्ये ११९ कॅप्ड खेळाडू आहेत. तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या २८२ आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने