Lionel Messi : मेसीने तर कमाल केली, जाणून घ्या मुख्यमंत्री शिंदे असे का म्हणाले...



ब्युरो टीम : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यास वर्गाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी सभागृहाचं कामकाज समजवून घेण्याच्या उद्देशानं सभागृहात आलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ३५ वर्षीय अर्जेटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेसीचे उदाहरण देताना विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. 

दरवर्षी हिवाळी अधिवेशनात राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे अभ्यास वर्ग भरवला जातो. विधानपरिषदेच्या सभागृहात हा वर्ग चालतो. कामकाज सुरु होण्याच्या १५ मिनीटे आधी हा वर्ग संपतो. संसदीय- विधिमंडळ कामकाज, लोकशाही वगैरे विषयांवर विविध आमदार यावेळी मार्गदर्शन करतात. या वर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं महत्त्व समजावून सांगताना फुटबॉल विश्वचषकामधील मेसीच्या खेळाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले,    ‘उदाहरण द्याचं झालं तर परवा आपण जो काही फुटबॉल विश्वचषकाचा सामना पाहिला, त्यामध्ये मेसीला आपण पाहिलं. मेसीनं तर कमाल केली. हा मेसी काय एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जग्गजेता संघ उभा करण्यामागे जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी आहेत. डेडिकेशन, डिव्होशन अशा साऱ्याच गोष्टी यात आहेत. हे करत असताना त्यामागे त्याग आणि इतरही बऱ्याच गोष्टी असतात. अशी उदाहरणं अनेक आहेत, असे सांगताना शिंदे पुढे म्हणाले, ‘क्षेत्र कुठलं असलं तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत आणि त्या टाळूही नये.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने