Love jihad : लव्ह जिहादविरोधात नगरमध्ये रान पेटलं, हिंदू जनजागृतीचा भव्य मोर्चा



ब्युरो टीम : दिवसेंदिवस लव्ह जिहादचे प्रकार वाढत असल्यामुळे याच्या निषेधार्थ आज, बुधवारी नगर शहरांमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भव्यदिव्य  मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शिवसेना, भाजपा सह राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला होता. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी' व 'जय श्री रामाच्या' घोषणांनी परिसर  दुमदुमून गेलेला होता . काजल हिंदुस्तानी व कालीचरण महाराज हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 

नगर शहरांमध्ये लव्ह जिहाद या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आज मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्यावेळी चोख असा पोलीस बंदोबस्त  तैनात करण्यात आलेला होता. नगर शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या मोर्चाची सुरुवात झाली. माळीवाडा, आशा टॉकीज चौक, कापड बाजार, तेलीखुंट,चितळे रोड मार्गे दिल्लीगेट या ठिकाणी हा मोर्चा आला व दिल्ली गेट या ठिकाणी सभेमध्ये त्याचे रूपांतर झाले. सकाळी अकरा वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा संदर्भामध्ये वेगवेगळे विषय आता पुढे येऊ लागलेले आहे, तसेच दिवसेंदिवस लव्ह जिहादचे प्रकार वाढत चाललेले आहे.यासाठी  कडक  कायदा करावा अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनेची मागणी यावेळी करण्यात  आली. 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' , 'जय श्रीराम' ,असा घोषणा यावेळी  देण्यात आल्या. मोर्चामध्ये महिलांची सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आली. भगव्या टोप्या, भगवे पंचे, भव्य ध्वज या मोर्चामध्ये दिसून आले होते . या मोर्चाचे नेतृत्व सर्व हिंदुत्ववादी संघटना केले, महिला वर्ग मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने