Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटक पोलिसांकडून राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर लाठीचार्ज?



ब्युरो टीम : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे नेते संजय पवार हे बेळगावच्या दिशेनं निघाले असून त्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोलनाक्यावर अडवल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी हसन मुश्रीफ यांच्यासह मोर्चामध्ये असणाऱ्या इतरांवर कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं वृत्त आहे. खुद्द मुश्रीफ यांनी फेसबुकवर पोस्ट करीत ही माहिती दिलीय.

महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावात आयोजित केलेल्या मेळाव्याला ऐनवेळी कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे. कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावात होत असल्यानं पोलिसांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत, याशिवाय कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी बेळगावच्या दिशेनं कूच केली. परंतु बेळगावला जाण्यासाठी निघालेल्या या मविआच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोलनाक्यावर अडवले. परंतु कोणत्याही परिस्थितीत मविआच्या नेत्यांनी बेळगावात जाण्याचा निर्धार केला असून त्यामुळं सीमाभागात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी येथे लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. 



याबाबत हसन मुश्रीफ यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘बेळगाव येथे मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी जात असताना कोगनोळी टोल नाक्याजवळ आल्यावर शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चे घेऊन जात असताना कर्नाटक पोलिसांकडून आमच्यावर लाठीहल्ला केला. एका लोकप्रतिनिधी वर असा हल्ला होत असेल तर तेथील मराठी भाषिकावर किती अन्याय व अत्याचार होत असेल याचा विचार केला पाहिजे.  लवकरात लवकर बेळगाव बिदर निपाणी कारवार सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने