Mahaviikas Aghadi vs BJP : महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपा देणार ‘माफी मांगो’ आंदोलनातून उत्तर



ब्युरो टीम : महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपानेही कंबर कसली आहे. भाजपाही उद्या मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांवर जोरदार तोफ डागली.

'आपलं अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊतांनी सोडलेली नाही. डॉक्टर चांगली औषधं देतो की कंपाऊंडर या वादात मला पडायचं नाही', असा टोलाही शेलार यांनी लगावला. यांची मस्ती आंबेडकरांच्या जन्मस्थळापर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरवणं अक्षम्य चूक आहे असंही त्यांनी म्हटलं.

'संजय राऊत उद्या स्वातंत्र्य, संविधान आणि बंधुताही उद्धव ठाकरेंमुळे मिळाली आहे, असं तर छापणार नाही ना? काय सुरु आहे?,' अशी संतप्त विचारणा यावेळी त्यांनी केली. 'नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु असून भाजपाला हे मान्य नाही. भाजपा याचा निषेध करत असून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी,' अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

संजय राऊत यांना भाई गिरकर यांनी आंबेडकरांसंबंधी दोन पुस्तकं पाठवली असल्याची माहिती देत त्यांनी कुरिअरची पावतीही दाखवली. 'बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित दोन पुस्तकं संजय राऊत यांना पाठवली आहे. त्यांनी याचा अभ्यास करावा,' असा टोला यावेळी त्यांनी लगावला.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने