शरद पवार यांनी पत्रात म्हंटले आहे...
'काल तुम्ही अहमदाबाद मधील हॉस्पिटलमध्ये जाऊन आईच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आणि त्यात सुधारणा होत असल्याचे समजल्यानंतर मला बरं वाटलं. मला माहितीये तुमचे आणि आईचे संबंध फार जवळचे आहेत. तुमच्यासाठी हा कठीण काळ आहे, याची देखील मला जाणीव आहे,' असे पवार यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे. पुढे ते म्हणतात, 'आई ही या जगातील सर्वात पवित्र अशी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्याला आकार देण्याचे आणि उर्जेचा एक अखंड स्त्रोत बनण्याचे काम तुमच्या आईने केले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्याला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!'
दरम्यान, हिराबेन मोदी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी अहमदाबाद येथील यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन तब्येतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशी चर्चा केली होती. हिराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टारांनी सांगितले आहे. हिराबेन यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा