ब्युरो टीम : भारतीय मध्य रेल्वेमध्ये एकूण २,४२२ अप्रेन्टिस पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दाहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आयटी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान, अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. १५ जानेवारी २०२३ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा