RBI : आरबीआयचा कर्जदारांना झटका, तुमचा EMI वाढणार



ब्युरो टीम : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज आपल्या चलनविषयक शमीच्या बैठकीचा आढावा प्रसिद्ध केला असून रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आहे. रेपो दर वाढल्यामुळे गृहकर्जासह सर्व कर्जे महाग होतील. वाढत्या महागाईच्या पार्शवभूमीवर आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे.

आरबीआयच्या या निर्णयानंतर सरकारी ते खासगी बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्जाचे व्याजदर वाढणार, त्यामुळे कर्ज घेणे किंवा जर तुम्ही आधीच कर्ज घेतले असेल तर तुमचा ईएमआय वाढणार आहे. सध्याच्या गृहकर्जाच्या व्याजदरात ०.३५ टक्के वाढ होणार आहे कारण रेपो दराशी संबंधित गृहकर्जावरील व्याजदर वाढणार आहेत. तुमचा ईएमआय किती महाग होईल ते आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊया.

जर, तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक, एसबीआयकडून २५ लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी ३१,५३८ रुपयांची ईएमआय २० वर्षांसाठी ८.४० टक्के व्याजदराने भारत आहेत. पण आता मुख्य व्याजदर ३५ बेस पॉईंट्सने वाढल्यानंतर, व्याजदर ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढेल, ज्यावर तुम्हाला २२,०९३ रुपयाचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच तुमचा ईएमआय ५५५ रुपयांनी महाग होईल आणि तुम्हाला संपूर्ण वर्षभरात ६,६६० रुपये अधिक व्याज भरावा लागेल.

तसेच , जर तुम्ही १५ वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, ज्यावर तुम्हाला सध्या ८.४० टक्के व्याजदराने ४८,९४४ रुपये ईएमआय भरावा लागत आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या दरवाढनंतर व्याजदर ८.७० टक्क्यांपर्यंत वाढेल, ज्यावर ४९,९७२ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजे आता दर महिन्याला १०२८ रुपये अधिक ईएमआय भरावे लागणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने