Rohit Pawar : पंतप्रधान मोदींशी आमचे वैचारिक मतभेद असतील, पण... रोहित पवारांचे स्पष्ट मत



ब्युरो टीम : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवर भारतामधील राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भुट्टोंच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

'पंतप्रधान मोदींसोबत आमचे वैचारिक मतभेद असले, तरी त्यांच्यावर केलेली टीका कोणताही विरोधी पक्ष कदापी सहन करणार नाही. वास्तविक भारतावर टीका करण्यापेक्षा त्यांनी आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याकडं लक्ष देण्याची गरज आहे,' असा जोरदार टोला रोहित पवारांनी पाकिस्तानला लगावला आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1604333918970269696?t=et3DGsBOQ72ko6i1nSQXDA&s=19

'पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि देशातील विविध प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी केलेली दिसतेय. याचा तीव्र निषेध. भुट्टो यांनी आपली मर्यादा सांभाळावी,' असेही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला भारताने शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. या अभद्र टीकेद्वारे पाकिस्तानने नवी नीचतम पातळी गाठल्याची कठोर टीका भारताने केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने