ब्युरो टीम : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मुंबई) चे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर, २०२२ रोजी नागपूर येथे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दवेंद्र फडवणीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस सर्वांना खुला करण्यात आला. नागपूर ते शिर्डी या ५२० कि.मी. च्या टप्प्यात शुक्रवारपर्यंत ५० हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक व चालकांची कुठेही गैरसोय होऊ नये, याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुरेपुर काळजी घेतलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा