Samruddhi Mahamarg : जाणून घ्या शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर



इंधनस्थळ 

समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी व शिर्डीहुन  नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी इंधनाची सोय करण्यात आलेली आहे.

नागपूर ते शिर्डी

*जिल्हा*        *गाव*    *सा.क्र.*

नागपूर।        वायफळ   11 + 200

अमरावती      शिवनी    136 +400

बुलढाणा     डोणगाव    268 + 200

बुलढाणा       मांडवा     310 + 600

जालना        कडवंची   353 + 800

औरंगाबाद      पोखरी   419 + 000

औरंगाबाद     अनंतपूर  461 +700


शिर्डी - नागपूर


*जिल्हा*        *गाव*      *सा.क्र.*

औरंगाबाद     डवाळा    497 + 600

बुलढाणा       मांडवा     311 + 000

बुलढाणा     डोणगाव    268 +900

अमरावती      शिवनी     136 + 700

नागपूर       रेणकापूर     80 + 400

नागपूर        वायफळ    10 + 300

स्नॅक्स

या इंधन स्थानकावर स्नॅक्स, पिण्याचे पाणी तसेच टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. तसेच वाहनाच्या किरकोळ दुरुस्तीची सुविधा इंधन स्थानकाजवळ पुरवण्यात आली आहे. याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रवाशांना ती सुविधा उपलब्ध  करुन दिली जाईल.

प्रसाधनगृह

या १३ इंधन स्थानकांवर प्रसाधनगृहाची सुविधा आहे. तसेच पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा आहे.

अपघाताच्या वेळेस अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी खालील प्रकारे सुविधा देण्यात आलेली आहे.

शीघ्र प्रतिसाद वाहने (QRV) एकूण २१ वाहने 

द्रुतगती मार्गावर इंटरचेंजवर २१ सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने तैनात आहेत. घटना घडल्यानंतर तातडीने अपघातस्थळी ही वाहने पोहचतील. या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी व घटना नियंत्रण करणेसाठी फायर फायटिंग सिस्टिम, कटर्स, ऑक्स‍िजन सिलिंडर्स, हायड्रॉलिक जॅक, प्रथमोपचार सुविधा व उपकरणे इ. अत्याधुनिक सुविधा ठेवण्यात आलेल्या आहेत.

क्रेन

अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला घेण्यासाठी ३० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन २४ तास तैनात आहे. अपघाताची सूचना मिळताच क्रेन तातडीने घटनास्थळी पोहचेल. क्रेनची एकूण संख्या १३ आहे.

गस्त वाहने

प्रवाशांच्या मदतीसाठी एकूण १३ गस्त वाहने कार्यरत आहेत. अपघातानंतर वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने द्रुतगती मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना गस्त वाहनांमधील कर्मचारी करतील.

सुरक्षा रक्षक

द्रुतगती मार्गावर सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस (Highway Safety Police) तैनात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत.

रुग्णवाहिका 

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता १०८ क्रमांकावर संपर्क करावा.

हेल्पलाईन क्रमांक 

वाहनाचा बिघाड / अपघात झाल्यास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2233/ 8181818155 वर त्वरीत संपर्क करावा. सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. 

नियंत्रण कक्ष व मुख्य नियंत्रण कक्ष

नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रत्येक इंटरचेजच्या ठिकाणी स्वंतत्र नियंत्रण प्रणाली असून ते मुख्य नियंत्रण कक्षाशी संलग्न आहेत. औरंगाबादमधील सांवगी इंटरचेंज येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला असून सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जात आहे.

सुरक्षित प्रवासासाठी, नियमांचे पालन गरजेचे

अपघात होऊ नये व सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ.  सुस्थितीत असण्याची खात्री करणे. द्रृतगती मार्गावर वाहनाची गती विहित मर्यादित ठेवणे, जेणेकरुन सुरक्षित प्रवास होईल. लेनची शिस्त पाळणे, चूकीच्या बाजूने ओव्हरटेक करु नये, मुख्य मार्गिकेवर  वाहने पार्क करु नये, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, सीट बेल्ट वापरणे इ. बाबीचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे.असे ही श्री. अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने