ब्युरो टीम : अयोध्येतील तपस्वी छावणीचे संत महंत परमहंस दास यांनी अभिनेता शाहरुखबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जर मला जिहादी शाहरुख भेटला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन, असे म्हणतानाच महंत परमहंस दास यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केले आहे.
बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या पठाण या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शनं सुरू आहेत. यूपीमध्ये या सिनेमाविरोधातील आंदोलनं थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याचबरोबर अयोध्येतील ऋषी-मुनींनीही पठाण चित्रपटाविरोधात आघाडी घेतली आहे.
'पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. आमच्या सनातन धर्मातील लोक सतत याचा विरोध करत आहेत. आज आम्ही शाहरुख खानचं पोस्टर जाळलं आहे. आता मी त्याला शोधत आहे. जर मला तो कुठे सापडला तर त्याला जिवंत जाळून टाकू. जर इतर कोणी जाळलं तर त्याचा खटला मी लढेन. या चित्रपटावर बहिष्कार टाका असं मी आवाहन करतो,' असं परमहंस आचार्य म्हणाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा