Stock Market Updates : गुजरात, हिमालच प्रदेश निवडणुकीचा निकालाचा शेअर बाजारावर असाही परिणाम



ब्युरो टीम : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज, शुक्रवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने वेग पकडला तर निफ्टीतही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ११६ अंकांनी वाढून ६२,६८६ अंकांवर उघडला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९ अंकांच्या उसळीसह १८,६४८ अंकांवर उघडला. 

याशिवाय बँक निफ्टी विक्रमी पातळीवर व्यवहार करत असून एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्येही तेजी दिसत आहेत. इंडसइंड बँक, टाटा स्टील, ग्रासिम, अदानी पोर्ट्स वेगाने व्यवहार करत आहेत. एचसीएल टेक, टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

तसेच आशियातील बहुतांश शेअर बाजार तेजीसह दिसत आहेत. निक्केई, स्ट्रेट टाइम्स, तैवान, कोस्पी या बाजार तेजीसह व्यवहार करत आहेत, तर शांघाय, जकार्ता, हँगसेंग या बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने