ब्युरो टीम : भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा आई मीनल गावस्कर यांचे काल (रविवारी) मुंबईत निधन झाले. आईच्या निधनावेळी गावस्कर बांगलादेशमध्ये होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत ते समालोचन करत होते. आईच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर देखील गावस्करांनी समालोचन केले.
गावस्कर यांच्या आईची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. काल, रविवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्या भारताचे माजी विकेटकीपर आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष माधव मंत्री यांच्या धाकट्या बहीण होत्या. आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे सुनील गावस्कर आयपीएलच्या गेल्या हंगामातील बाद फेरीतील सामन्यात समालोचनासाठी उपलब्ध नव्हते.
दरम्यान, गावस्कर यांच्या कारकिर्दीत सुरुवातीच्या काळात आई मीनल आणि वडील मनोहर या दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. मीनल यांच्या पश्चात सुनील आणि त्यांच्या मुली नूतन आणि कविता, नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा