ब्युरो टीम : लग्न हे एक अतिशय पवित्र नातं आहे. जेव्हा दोन लोक विवाह बंधनात बांधले जातात, तेव्हा ते एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची, एकमेकांशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतात. पण आजच्या काळात लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज, अशी अनेक प्रकरणं समोर येतात, ज्यामध्ये पती किंवा पत्नीचं दुसऱ्यासोबत अफेअर सुरू होतं. पण असे अफेअर का सुरू होतात, यामागील कारण वेळीच जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुह्माला सुद्धा अशा विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते.
एखाद्या व्यक्तीला सध्याच्या विवाहित जीवनात प्रेमाची कमतरता जाणवते, अशा परिस्थितीत आयुष्याचा जोडीदार निवडण्यात स्वतःची चूक झाली आहे, असं त्याचं मत होत असतं. अशा लोकांना दुसऱ्याशी प्रेमसंबंध निर्माण करायचे असतात. हे रिलेशन इमोशनल किंवा सेक्सुअल अशा दोन्ही प्रकारचे असतात. अशा परिस्थितीत पत्नीनं अशी रिलेशनशिप तयार होण्यापासून जोडीदाराला वाचवलं पाहिजे. यासाठी तिनं तिच्या पतीशी या विषयावर खुलेपणानं बोललं पाहिजे.
आजच्या काळात लोकांची जीवनशैली खूप बदलली आहे. अशा परिस्थितीत रोमँटिक अफेअर हा प्रकार वाढतोय. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी जोडली जाते, तेव्हा अशी प्रकरणे समोर येतात. या नात्याची सुरुवात मैत्रीपासून होते, पण हळूहळू त्याचे रुपांतर प्रेमात होते. पुढे नातं अशा टप्प्यावर पोहोचतं की, हे प्रेमसंबंध संपवणं खूप कठीण होऊन बसतं.
सुखी वैवाहिक जीवनासाठी विश्वास आणि निष्ठा खूप महत्वाची असते. पण काही वेळा काही कारणांमुळे जोडीदाराची फसवणूक करुन ‘तो’ किंवा ‘ती’ लग्नानंतरही कोणाशी तरी अफेअर करतात. सुखी संसारासाठी हे वेळीच रोखणे गरजेचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा