ब्युरो टीम : 'आगामी काही दशकं आम्ही देशावर राज्य करू, असा दावा भाजपाकडून केला जातो. पुढील ५० वर्षे आम्हीच सत्तेत असू, असे भाजपाचे नेते म्हणत आहेत. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एकदा उत्तर प्रदेशमधील दोन मेडिकल कॉलेजला भेट द्यावी. मग त्यांना कळेल की, येथे त्यांचा किती जागांवर विजय होऊ शकतो. कदाचित भाजपाचा यावेळी उत्तरप्रदेशमधील सर्व ८० जागांवर पराभव होऊ शकतो,' असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले आहे.
पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देशभरातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपासह अन्य पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०२४ साली होणारी ही निवडणूक आम्हीच जिंकू, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. याच दाव्यावरून अखिलेश यादव यांनी भाजपला लक्ष केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा