Ambedkar Shinde Meeting : शिंदे-आंबेडकर यांच्यात अडीच तास खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?

ब्युरो टीम : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल, बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  या दोघांमध्ये तब्बल अडीच तास खलबंत सुरू होती. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि शिंदे गट या दोघांकडूनही या भेटीबाबत दुजोरा देण्यात आलाय. दुसरीकडे दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? याबाबात अद्याप काही समोर आलं नाही. त्याममुळे या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर शिंदे गटाबरोबर जाणार का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात विविध महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. याशिवाय, पुढील वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आताच तयारी सुरू केली असल्याचीही चर्चाही यानिमित्ताने रंगू लागली आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने