America Shooting : अमेरिका हादरली! 'येथे' झाला मशीनगनने तुफानी गोळीबार

ब्युरो टीम : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. या शहरात एका ठिकाणी मशीनगनने बेदकारपणे गोळीबार करण्यात आला आहे. याबाबत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दरम्यान, पोलीस अद्याप हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.  हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असल्याची माहिती मिळतेय.

लॉस एंजेलिस हे कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर त्याच्या नाइटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. येथे काल, शनिवारी रात्री मॉन्टेरी पार्क परिसरात गोळीबाराची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  या गोळीबारातील एकाही संशयिताला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. घटनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर घेरून शोधमोहीम राबवली जात आहे. या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने