ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने गाठलं होत. त्यातून ते सुखरूप सुटतील अस वाटत असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं.
पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषविले होते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
टिप्पणी पोस्ट करा