ब्युरो टीम : २०२३ मध्ये देशातील कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, छत्तीसगड, तेलंगणा अशा तब्बल नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ ठरू शकते.
नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणुका होणार आहेत. या राज्यांच्या विधानसभांच्या कार्यकाळ मार्चमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे, तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष सत्तेत आहे. तर, 'नॅशनल पीपल्स पार्टी' या पक्षाचे मेघालयमध्ये सरकार आहे. तर, कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे. या भाजपशासित राज्यात नवीन विधानसभा स्थापन करण्यासाठी एप्रिलअखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला मतदान होऊ शकते. तर, सन २०२३ च्या शेवटच्या टप्प्यात मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणाच्या विधानसभेची निवडणूक होतील.
याशिवाय, यंदाच्या वर्षी नऊ विधानसभा निवडणुकांसोबतच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातही निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नवीन वर्ष निवडणूक रणधुमाळीचे ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा