Global Terrorist : 'अब्दुल रहमान मक्की'चे आता काही खरं नाही! जागतिक दहशतवादी म्हणून बसला 'शिक्का'

ब्युरो टीम : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अल कायदा निर्बंध समितीने लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख  अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मक्की हा लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज मोहम्मह सईद याचा मोहुणा आहे. ही घोषणा करताना 'मक्की तसेच एलईटी, जेयूडी संघटनेतील लोक दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे, संघटनेत तरुणांची भरती करणे, तरुणांना हिंसा करण्यास भडकावणे, भारतात दहशतवादी हल्ले घडवणे अशा कारवायांत सहभागी आहेत,' असे निरीक्षण संयुक्त राष्ट्राने नोंदवले आहे.

मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केले जावे, अशी भारताची पूर्वीपासूनची मागणी आहे. मागील वर्षी जून महिन्यात अमेरिका आणि भारताने मक्कीला दहशतवादी घोषित करावे, अशा मागणीचे संयुक्त निवेदन दिले होते. मात्र चीनने ऐनवेळी या मागणीला विरोध केला होता. मात्र आता भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयानंतर अब्दुल मक्कीची संपत्ती जप्त करण्यात येणार असून प्रवासबंदी तसेच शस्त्र बाळगण्यावर बंदी असे निर्बंध त्याच्यावर लादण्यात येणार आहेत. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने