ताक प्या
ॲसिडिटीपासून झटपट आराम मिळवायचा असेल, तर ताक पिणं खूप फायदेशीर आहे. ताक पोटात थंडावा आणण्याचं काम करतं. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. अशावेळी ताक पिल्याने आराम मिळतो. ताकामध्ये पुदिना मिसळून प्यायल्याने पचनक्रियेसाठी फायदा होतो.
गूळ खा
गुळामध्ये पोषक घटक असतात. हे पचनासाठी फायदेशीर आहेत. गूळ खाल्ल्यानं ॲसिडिटीमध्ये आराम मिळतो. यामध्ये मॅग्नेशियम आणि फायबर असतात, जे अन्न पचण्यास मदत करतात. गूळ खाल्ल्यानं ॲसिडिटी आणि गॅसची समस्या होत नाही.
तुळशीची पाने खा
तुळशीमध्ये असलेले औषधी गुणधर्म पचनाशी संबंधित समस्या दूर करण्याचे काम करतात. तुळशीची पानं खाल्ल्यानं ॲसिडिटीची समस्या दूर होते. त्यामुळे पोटात थंडावा येतो. ॲसिडिटी झाल्यास तुळशीची पाने उकळून त्याचे पाणी प्यायल्यानं हा त्रास दूर होतो.
गरम पाणी प्या
थंड पाण्यामुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर जेवल्यानंतर काही वेळानं कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते, व ॲसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.
टिप्पणी पोस्ट करा