Health Tips : हो... हे खरे आहे, स्त्रियांप्रमाणेच काही पुरुषांनाही करावा लागतो रजोनिवृत्तीचा सामना!

ब्युरो टीम स्त्रियांमध्ये वय वर्ष 45 च्या आसपास रजोनिवृत्ती होते. यामध्ये, अंडाशयात तयार होणारे इस्ट्रोजेन हार्मोन पूर्णपणे कमी होतात, आणि त्यामुळे मासिक पाळी थांबते. या प्रक्रियेपूर्वी आणि नंतर महिलांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांमधून जावं लागतं. पण पुरुषांच्या बाबतीतही असं घडतं का? पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन प्रजननासाठी जबाबदार असतो. वाढत्या वयाबरोबर टेस्टोस्टेरॉन हार्मोनही कमी होतो. परंतु स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती दिसून येत नाही. पण काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, पुरुषांना देखील स्त्रियांप्रमाणे रजोनिवृत्ती येते.

मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यावर त्यांना स्त्रियांप्रमाणेच रजोनिवृत्ती येते की नाही, याबद्दल डॉक्टरांचे अजूनही एकमत नाही. परंतु वय वर्ष 50 च्या आसपास किंवा त्यानंतरही काही पुरुषांमध्ये ही समस्या महिलांप्रमाणे दिसते. 

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ‘वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. या दरम्यान, पुरुषांना देखील काही समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु ज्यांना मधुमेह आहे, त्यांना अधिक त्रास होतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झाल्यानंतर, त्यांना पुढील काही महिने थकवा अधिक येतो. अशा पुरुषांमध्ये अशक्तपणा येतो, आणि ते नैराश्यात जगू लागतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झाल्यास लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. चिडचिड होते. त्वचाही पातळ होऊ लागते. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते. जास्त घाम येतो, आणि काही पुरुषांना महिलांप्रमाणे हॉट फ्लॅशेज येतात.

या वयात येते पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती!
 
पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोन पूर्णपणे नाहीसे होत नाही, परंतु त्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते. डॉक्टरांच्या मते,  80 वर्षांपर्यंत निरोगी पुरुषामध्ये शुक्राणू तयार होऊ शकतात. तर, काही पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती 50 वर्षांच्या आसपास सुरू होते, तर काहींमध्ये ती वय वर्ष 70 पर्यंत कधीही सुरू होऊ शकते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने