Health Tips : तरुण दिसण्यासाठी प्या फक्त एक कप हा ‘जादूई’ चहा!

ब्युरो टीमतुमच्या चेहऱ्याची चमक आणि फिटनेस पाहून लोक तुमच्या वयाचा अंदाज लावतात. प्रत्येकाला वृद्धत्वाची चिंता असते, आणि प्रत्येकजण सतत तरुण दिसावे, यासाठी त्वचेची काळजी घेत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, असे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत, ज्यांच्या मदतीने चमकदार आणि डागरहित त्वचा मिळवता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चहाची माहिती देणार आहोत, जो नियमित प्यायल्यानं तुम्हाला खूपच फायदा होईल. चला तर मग, जाणून घेऊया या चहाबद्दल.

चमकदार व निरोगी त्वचेसाठी  जास्वंदीचा चहा

जास्वंदी ही केवळ शोभेची वनस्पती नाही. तर, त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी ती वापरतात. या वनस्पतीमध्ये अँटीफर्टिलिटी, अँटीमाइक्रोबियल, अँटीअल्सर, अँटीजनोटॉक्सिक, अँटीऑक्सिडेंट, अँटीडायबिटिक, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेच्या काळजीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

काय आहेत फायदे?

- अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध, जास्वंदी निरोगी कोलेजन लेव्हल वाढवते व त्वचा मजबूत करते. हा गुणधर्म हायपरपिग्मेंटेशन असलेल्या लोकांना मदत करू शकतो. जास्वंदीमध्ये मायरिसेटिन नावाचे संयुग देखील आहे, जे कोलेजनचा ऱ्हास होण्याचा वेग कमी करू शकतो.

- जास्वंदी कोणत्याही प्रकारच्या स्किनचा टोन, हायपरपिग्मेंटेशन, काळे डाग कमी करण्यासाठी तात्काळ उपाय म्हणून काम करते. त्याचे गुणधर्म त्वचेचा टोन सुधारून पेशींचे पोषण करतात.


- जास्वंदीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट असतात, जे फुलाला गुलाबी-लाल रंग देतात. ते त्याच्या अँटी इनफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी देखील जबाबदार आहेत. ते ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

- जास्वंदीचा चहा शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी देखील घेतला जातो. त्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे, ते त्वचेला कोमल बनवते, मॉइश्चरायझेशन करते आणि त्वचेमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारते.


- जास्वंदीचा चहा नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. हे शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढू शकते, आणि युव्हीबी (UVB) किरणोत्सर्गाच्या जास्त संपर्कामुळे होणाऱ्या मेलेनिन संश्लेषण कमी करू शकते.

सौंदर्य आणि आरोग्यविषयक  सर्व अपेक्षा पूर्ण करणारा एखादाच उपाय असावा, असं अनेकांना वाटत राहातं. असा उपाय म्हणजेच जास्वंदीच्या फुलाचा चहा  पिणं हा होऊ शकतो. फक्त तो योग्य पद्धतीने बनवणे महत्त्वाचे आहे.

कसा बनवाल जास्वंदीचा चहा?

जास्वंदीचा चहा बनवण्यासाठी सर्वात प्रथम 2 कप ताजी किंवा वाळलेली जास्वंदीची फुले घ्या. त्यामध्ये 8 कप पाणी टाका. जर तुम्ही चहासाठी जास्वंदीची ताजी फुले वापरत असाल, तर फुलांच्या तळाशी असलेला हिरवा भाग काढून टाका, आणि जर तुम्ही वाळलेली फुले वापरत असाल, तर तुम्हाला फुलांच्या तळाशी असणारा हिरवा भाग काढण्याची गरज नाही.  आता एका मोठ्या भांड्यात जास्वंदीची फुले आणि पाणी उकळवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करून भांडे झाकून ठेवा. यामध्ये तुम्ही तुळस, गवतीचहा आदी औषधी वनस्पती सुद्धा टाकू शकता. तसेच हा चहा चांगला उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये ¼ कप मध व 3 चमचे ताज्या लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर चहा गाळून घ्या. हा चहा तुम्ही गरमागरम सर्व्ह करू शकता किंवा फ्रीजमध्ये काही तास ठेवू शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने