रेड मीट : रेड मीटमध्ये (Red Meat) भरपूर सॅच्युरेटेड फॅट आणि मीठ असते, त्यामुळे असे मांस महिन्यातून एकदाच खाण्याचा सल्ला दिला जातो. हे मांस खाल्याने प्रोटीनची गरज पूर्ण होत असली तरी हे मांस अतिरिक्त चरबी कोलेस्ट्रॉल वाढवते, आणि हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनते.
इन्स्टंट नूडल्स : हे कॉलेजमधील विद्यार्थी, अविवाहित व्यक्ती यांचा आवडता पदार्थ असतो. कारण ते कमी वेळेत व सोप्या पद्धतीने तयार करता येते. परंतु नियमितपणे याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामध्ये तेल आणि सोडियमचा वापर जास्त होतो, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढते आणि हृदयविकाराचा झटका येतो.
ब्लेंडेट कॉफी : ब्लेंडेड कॉफीमध्ये भरपूर कॅलरी आणि फॅट असतात. तसेच त्यात असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. शरीराला सर्वाधिक नुकसान कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे होते, जे ब्लड प्रेशर वाढवण्याचे काम करते, आणि नंतर हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयविकाराचा झटका येतो.
फ्रेंच फ्राईज : हे खूप गरम तेलात शिजवले जातात, व यामध्ये भरपूर सोडियम, ट्रान्स फॅट्स, कार्ब्स असतात. ते आरोग्यासाठी खूप धोकादायक मानले जातात.
पिझ्झा : हा बहुतांश तरुणांची पहिली पसंती आहे. पण त्यात फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. यातील चीज कोलेस्ट्रॉल आणि बल्ड प्रेशर वाढवते, व यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल, तर पिझ्झा तयार करताना गहू आणि ऑलिव्ह ऑइल वापरा.
टिप्पणी पोस्ट करा