ब्युरो टीम : व्हॉटस ॲप व इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या २१ वर्षीय तरूणीने राहुरी (जि. अहमदनगर) येथील एका ४० वर्षीय व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याच्याशी जवळीक साधून त्याला एका लॉजवर बोलावून त्याच्या बरोबर नको त्या अवस्थेत फोटो व व्हिडिओ शुटींग केले. तरूणीने त्या फोटोच्या आधारे व्यापाऱ्यांकडून काही रक्कम वसूल केली. नंतर ३० लाख रूपयांची खंडणी मागीतली. या घटनेतील तरूणी व एक तरूण अशा दोघां जणांना राहुरी पोलिस पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले.
राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द परिसरातील एका ४० वर्षीय व्यापाऱ्याला एका अनोळखी तरूणीने फोन करुन क्रेडीट कार्ड पाहिजे का? असे विचारले. त्यानंतर दोघांची ओळख होऊन व्हॉटॲप व इन्स्टाग्रामवर चॅटींग चालू झाली. सदर तरूणीने गोड बोलून त्या व्यापाऱ्याकडून काही रक्कम वसूल केली. ती रक्कम परत घेण्यासाठी व्यापाऱ्याने तरूणीला फोन केला. तेव्हा तीने शिर्डीला आल्यावर तूमचे पैसे देते, असे सांगितले. १७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्या तरूणीने व्यापाऱ्याला कोल्हार खुर्द येथील एका लॉजवर बोलावून घेतले. दोघांची भेट झाल्यावर तिने व्यापाऱ्याला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन दारू पाजली. नंतर व्यापाऱ्या बरोबर नको त्या अवस्थेत व्हिडीओ काढून घेतला. त्यानंतर तरूणीने व्यापाऱ्याला लग्न कर नाहीतर ३० लाख रूपये दे, अन्यथा तूझा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. दरम्यान त्या तरूणीने व्यापाऱ्याकडून सुमारे ५० हजार रूपये वसूल केली. सदर व्यापाऱ्याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार पोलिसांनी तपास करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सोशल मिडीयावर कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत मैत्री करु नका. सध्या सेक्सटोर्शन हा गुन्ह्याचा प्रकार खुप जास्त प्रमाणात आढळुन येत असल्याने बरेच नागरिक यास बळी पडत आहेत. असा प्रकार झाल्यास त्वरीत पोलिसांना कळवावे. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा