Koyta Gang : कोयता गँग विरोधात पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये

ब्युरो टीम : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगकडून दहशत माजवल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली असली. तरी अद्याप ही हातात कोयते नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच काम काही जण करत असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना घडू नये यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.

पुण्यातील एसआरपीएफ,ग्रुप, रामटेकडी येथे ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

पुणे शहरात मागील काही महिन्यापासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच राज्यातील पोलीस उपअधीक्षक यांच्या बदल्या अद्याप ही प्रलंबित आहेत. त्या प्रश्नावर रजनीश शेठ म्हणाले की, 'पोलीस उपअधीक्षकाच्या बदल्या लवकरच होतील.त्या संदर्भात गृह विभागामार्फत पावल उचलण्यात आली आहेत'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने