नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आल्यानंतर, काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना या जागेसाठी उमेदवारी घोषित केली होती. सुधीर तांबे हे काँग्रेसकडून तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी आपली उमेदवारी मागे घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. या प्रकारामुळे काँग्रेला मोठा धक्का बसला आहे. पण यासर्व प्रकारावर काँग्रेसने सावध प्रतिक्रीया दिली आहे.
याबाबत नाना पटोले म्हणाले की, ‘मी मीडियाद्वारे ही बातमी बघत होतो. डॉ. सुधीर तांबे यांचे वक्तव्यंही मी ऐकत होतो. सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ, नेमकं काय झालं त्याची कारणं काय?, या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतरच यावर पक्षपातळीवर चर्चा करून, निश्चितपणे जे काही झालं, त्यावरचं स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला देऊ. भाजपाचे लोक काहीही बोलू शकतात. म्हणून मी सांगतोय की सगळी माहिती घेऊनच आम्ही प्रतिक्रिया देऊ.’
टिप्पणी पोस्ट करा