Nashik Graduates Constituency : नाशिकमध्ये 'या' तांबेंसह सहा जणांनी घेतली माघार

ब्युरो टीम : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी  अर्ज मागे घेतले असून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.

अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय कृष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.

रतन कचरु बनसोडे (नाशिक वंचित बहुजन आघाडी), सुरेश भिमराव पवार (नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), अनिल शांताराम तेजा (अपक्ष), अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर (अपक्ष), अविनाश महादू माळी (अपक्ष), इरफान मो इसहाक (अपक्ष), ईश्वर उखा पाटील (अपक्ष), बाळासाहेब रामनाथ घोरपडे (अपक्ष), ॲड. जुबेर नासिर शेख (अपक्ष), ॲड.सुभाष राजाराम जंगले (अपक्ष), सत्यजित सुधीर तांबे (अपक्ष), नितीन नारायण सरोदे (अपक्ष), पोपट सिताराम बनकर (अपक्ष), शुभांगी भास्कर पाटील (अपक्ष), सुभाष निवृत्ती चिंधे (अपक्ष), संजय एकनाथ माळी (अपक्ष) असे एकूण १६ उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने