नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक माघार घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यातच आता या निवडणुकीत बावनकुळे यांच्या वक्तव्यानं आणखी एक ट्विस्ट आला आहे.
बावनकुळे म्हणाले, ‘भाजपातर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचाच विचार आम्ही करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. सत्यजीत तांबे यांनी आज तरी आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही, पण जर त्यांनी भूमिका घेतली तर त्याला आम्ही प्रतिसाद देऊ,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, सत्यजीत तांबे आता नाशिक पदवीधरमधील अपक्ष उमेदवार असतील. सत्यजीत तांबे गेल्या २२ वर्षांपासून काँग्रेसच्या पक्ष संघटनेत कार्यरत असून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे म्हणून देखील त्यांची ओळख आहे.
टिप्पणी पोस्ट करा