Nashik MLC Election : या निवडणुकीत एकच नंबरी ठरणार नगरी!

ब्युरो टीम : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी एकूण २ लाख ५८ हजार ३५१ उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. त्यात एकट्या नगर जिल्ह्यातून १ लाख १६ हजार मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील मतदान निर्णायक ठरणार आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांसाठी तर नाशिक ,अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरेल. 

पदवीधर मतदारसंघासाठी एकूण दोन लाख ५८ हजार ३५१ उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. त्यात नगर जिल्ह्यातून १ लाख १६ हजार मतदार आहेत, तर नाशिक जिल्ह्यातून अवघे ६६ हजार ७०९ मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यातून ३३ हजार, धुळे जिल्ह्यातून २२ हजार, तर नंदुरबारमधून सुमारे १९ हजार मतदारांची नोंदणी झालेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात सुमारे ४७ हजार मतदार जास्त आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नगर जिल्ह्याचे मतदान निर्णायक ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने