National Award Winning Films : राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट मोफत पहायचे आहेत? मग ही बातमी वाचाच

ब्युरो टीमजिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. २४ जानेवारी पर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे तो सुरु राहणार आहे. महोत्सवासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

महोत्सवाचे उद्घाटन काल, शनिवार (२१ जानेवारी ) रोजी  सांस्कृतिक कार्य विभागचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या उपस्थितीत झाले. या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'फनरल', 'झिपऱ्या', 'एक हजाराची नोट' ,  'कासव', 'श्वास', 'धग', 'इन्व्हेस्टमेंट', 'गोष्ट एका पैठणीची' हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी प्रकल्प संचालक संतोष रोकडे व श्रीमती स्नेहल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने