Pankaja Munde : पंकजा मुंडे भाजपवर नाराज? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे थेटच बोलले



ब्युरो टीम : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे  नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं जाहीरपणे सांगितलही आहे. पण दुसरीकडे ही चर्चा थांबायला तयार नाही. मात्र, आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भाष्य करीत थेट विरोधकांवर निशाणा साधला आहे.

'पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. मात्र, त्यांच्याविरोधात विरोधक षडयंत्र रचत असून, चुकीच्या बाबी पसरविण्यात येत आहेत,' असा आरोप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विरोधकांवर केला आहे.

आज, रविवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ते अकोल्यात आले असता माध्यमांशी बोलत होते.  यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, उमेदवार डॉ. रणजीत पाटील, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने