ब्युरो टीम : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने आसामच्या मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री २ वाजता फोन करून एक विनंती केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटनुसार, शाहरुखने त्यांना रात्री २ वाजता फोन केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'पठाण' ला सुरक्षा देण्याची हमी दिली.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्वीट करत शाहरुखने आपल्याला फोन केल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री ट्वीट मध्ये म्हणतात, 'बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांनी मला रात्री उशिरा २ वाजता फोन केला होता. त्यांनी गुवाहाटीमध्ये 'पठाण'च्या स्क्रीनिंग दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मी त्यांना आश्वासन दिलंय की ही राज्य सरकारची ड्युटी आहे की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील. आम्ही अशा घटना परत होऊ नयेत यासाठी प्रयत्न करू.'
https://twitter.com/himantabiswa/status/1617020280152666117?t=8KiocOkiEDiAddvQq4XlXg&s=19दरम्यान, नुकतंच आसाम राज्यात 'पठाण' चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं. मात्र त्यादरम्यान चित्रपट दाखवणाऱ्या थिएटरची तोडफोड करण्यात आली. 'पठाण' चित्रपटामुळे बराच वाद सुरू आहे. या चित्रपटातील गाणं 'बेशरम रंग' ला सोशल मीडियावर जोरदार विरोध होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा