ब्युरो टीम : राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची चिन्ह आहेत. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही तयारी सुरू केल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व तालुका अध्यक्ष आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसोबत पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज पुण्यात संवाद साधणार आहेत.पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात बैठक पार पाडत आहे. या बैठीला जिल्ह्यातील तीन आमदारांनी हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यायाचे मावळचे आमदार सुनील शेळके, शिरूर मतदारसंघातले अशोक पवार आणि आंबेगाव तालुका मतदारसंघातले दिलीप वळसे पाटील हे बैठकीला उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला, असं सांगत कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील गटतट दूर झाले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपलीच सत्ता येईल, असं कार्यकर्त्यांनी पवारांना सांगितलं.
दरम्यान, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मनसे, भाजप, शिवसेना ठाकरे गट, बाळासाहेबांची शिवसेने शिंदे गट, असे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या सगळ्या पक्षांमध्ये आता राजकारणातला तेल लावलेल्या पैलवाननेही उडी घेतली आहे. अर्थात शरद पवार यांनीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा