Shiv Sena Leader Anil Parab : मोठी बातमी, माजी मंत्री अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त


ब्युरो टीम
: राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या १०.२० कोटी रुपयांची मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तात्पुरती जप्ती आणली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार असल्याचे समजते.

ईडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. त्यामुळेच ईडीने मुरुड दापोली मधली ४२ गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. या जमिनीची किंमत २ कोटी ७३ लाख ९१ हजार रुपये असून अलिबाग येथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्ट एनएक्सची किंमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार रुपये आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने