Shivsena vs Sujay Vikhe : शिवसेनेकडे अवघे दोन आमदार, खासदार विखे असे का म्हणाले? वाचा

ब्युरो टीम :  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत, असं म्हंटल आहे.  यावर काँग्रेस किंवा शिवसेना यांनी आपली भूमिका अद्याप मांडली नाही. त्यावरून भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस, शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. 'काँग्रेस भूमिका कधी मांडू शकत नव्हती, आणि शिवसेनेकडे दोन आमदार राहिलेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा काही विषयच राहिला नाही,' असे खासदार विखे म्हणाले.

नगर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन चित्रपट क्षेत्रातील कलाकारांशी बैठक घेतल्याने  फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशमध्ये जाईल, या चर्चेला उधाण आले आहे. यावर बोलताना खासदार विखे म्हणाले की, 'फिल्म इंडस्ट्री कोणी कुठेही पळून घेऊन जात नाही, अनेक चित्रपट निर्माते बाहेरच्या देशात जाऊन शूटिंग करतात. मग काय ते तिकडेच स्थायिक होत नाही. शेवटी त्यांनी केलेल्या व्यवसायातुन सरकारला मिळालेलं उत्पन्न, हे केंद्राच्या जीएसटीच्या माध्यमातून सरकारलाच मिळणार आहे. महाविकास आघाडीला कुठल्याही प्रकारचे काम नसल्यामुळे ते असे मुद्दे पुढे आणत आहेत.' 

जनतेच्या प्रेमामुळे राजकारणात 

'मला जनतेच्या प्रेमामुळे राजकारणात यावं लागलं. डॉक्टर या नात्याने मी माझा व्यवसाय चांगला करत होतो. मला आजही वाटतं, मी राजकारणात नसताना समाजाला चांगलं दिशा देण्याचे काम करू शकतो. मात्र जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडावी लागते, आणि ती पार पाडत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संदेश पुढे घेउन जावं लागणार आहे. मी एक माध्यम म्हणून तो संदेश पुढे घेऊन जात आहे,' असंही खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने