sudhir tambe : काँगेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर डॉ.सुधीर तांबे म्हणाले...

ब्युरो टीम : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षानं उमेदवारी देऊनही अर्ज दाखल न केल्यावरून काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. झालेल्या प्रकारानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली. सुधीर तांबे यांनीही ट्विट करुन परखडपणे आपली भूमिका मांडली आहे

‘माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे,’  असे ट्विट तांबे यांनी केले आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष याप्रकरणाची चौकशी कधीपर्यंत पूर्ण करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यानच्या काळात सुधीर तांबे काही वेगळा निर्णय घेणार का, हेदेखील पाहावे लागेल.

दरम्यान, दुसरीकडे तांबे कुटुंबीय आणि ठाकरे गटाच्या खेळी-प्रतिखेळीमुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत रंगत भरली आहे. या मतदारसंघातील एकूण अडीच लाखांवर उमेदवारांपैकी तब्बल एक लाखावर उमेदवारांची नोंदणी एकट्या नगर जिल्ह्यातून असून, हा तांबेंचा बालेकिल्ला आहे. मात्र, उर्वरित दीड लाख मतांचा विचार करता नाशिक या निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने